ब्रेकिंग न्यूज

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार‌ डॉ अमोल कोल्हे. पण विकास काम व सक्रिय आहेत

09/05/2023 10:46:09  665   श्री योगेश लंघे पाटील

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार‌ डॉ अमोल कोल्हे. पण विकास काम व सक्रिय आहेत.मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

 

 

2019 मध्ये मोठा गाजावाजा करून लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिलेले व 50 हजाराच्या फरकाने निवडून आलेले खासदार अभिनेते डॉ अमोल कोल्हे हे सध्या मतदारसंघांमध्ये दिसेनाशे झाले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला एक चांगला खासदार मिळाला अशी भावना निर्माण झाली होती. परंतु डॉ अमोल कोल्हे यांनी मतदारसंघातील जनतेचा पूर्ण हिरमोड केला असल्याचे चित्र सध्या आहे. मतदान झाल्यापासून खासदार कोल्हे हे मतदारसंघांमध्ये कधीतरीच दिसतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसत आहे. माजी खासदार शिवाजीराव पाटील हे मात्र आपल्या नेहमीच्या शैलीतच मतदारसंघांमध्ये लक्ष देऊन असून व विकास कामांचा धडाका लावला असून यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आढळराव हे माजी खासदार असून देखील खासदार असल्यासारखी काम करत असल्याने नक्की जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नक्की शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण. डॉक्टर कोल्हे हे फक्त एखाद्या सेलिब्रिटी सारखे कोणत्यातरी एखाद्या कार्यक्रमांमध्ये येतात व परत दिसेनासे होतात. अशी सध्याची परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये नक्की खासदार कोण हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ह्या सर्व परिस्थितीमुळे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांची 2024 ची तयारी जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले देवदत्त निकम यांनी शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या‌. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठे प्रश्न निर्माण झालेले असून रस्ते तरुणांचा रोजगार‌. यासारखे गंभीर प्रश्न निर्माण असून देखील विद्यमान खासदार हे त्यांच्या शूटिंगमध्येच व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. नक्की शिरूर लोकसभा मतदारसंघाने अभिनेता दिला की नेता दिला अशी टीका आंबेगाव तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख अरुण भाऊ गिरे यांनी केली. तिकडे आढळराव पाटील यांना ठाकरे गटातील काही नेते हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले . काहीतरी उलट फिर होण्याची शक्यता असल्याचे वर्तवली जाते आहे .यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार शिवाजीराव पाटील यांचे पारडे जड असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा गड सर करावा लागणार आहे.आढळराव पाटील हे खासदार नसले तरीही रोज जनतेच्या संपर्कात असून रोज मतदार संघामध्ये वेळ देत असून .त्याचा जनता दरबार हा कदर रविवार न चुकता भरत आहे .शिरुर लोकसभा मतदारसंघ पिजुन काढला जात आहे. रोज विकास कामांचा धडाका त्यांनी लावला आहे करोडो रुपयाचा निधी मतदार संघात आणून त्यांनी जनतेच्या मनामध्ये मोठे स्थान निर्माण केले आहे.

माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम लांडेवाडी येथे दिनांक दहा रोजी संपन्न होणार आहे या निमंत्रण पत्रिकेमध्ये आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील व खासदार अमोल कोल्हे यांची नाव नसून बाकी सर्व नेत्यांची नाव असल्याने. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या नंतर त्यांचे नाव घेतले जाते ते मा। सभापती देवदत्त निकम हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याने शिवाजीराव पाटील यांना याचा फायदा होऊ शकतो. असे जाणकारांचे मत आहे. निकम यांच्या मागे शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये तरुणांची मोठी फौज आहे. तसेच आताच बाहेर आलेले पैलवान मंगलदास आप्पा बांदल हे देखील शिवाजीराव पाटील यांच्याबरोबर मतदारसंघांमध्ये दिसत आहे. आढळराव यांचा प्रचार करताना दिसत आहे ‌‌‌.त्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक जड जाणार यात काही शंका नाही.