अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांच्या विजयाने आंबेगाव तालुक्यात सगळ्यांच्या किटल्या गरम
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर झालेल्या निवडणुकी मध्ये पक्षाशी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस चे फायर ब्रँड नेते देवदत्त निकम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्षालाच चॅलेंज केले होते.
आंबेगाव शेतकरी विकास आघाडी पॅनल च्या नावाने पॅनल उभे करून मोठी ताकद निर्माण केली. व पक्षालाच आव्हान दिले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार अशी चर्चा जोरदार सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाप्रमुख विष्णू काका हिंगे यांनी दोन दिवसाचा अल्टीमेट निकम यांना दिला होता. माघार घेऊन पक्षाच्या उमेदवारांना निकम यांनी पाठींबा जाहीर करावा अन्यथा निलंबित करण्यात येईल. असे सुद्धा बोलले गेले होते. परंतु पक्षाने कोणतीही कारवाई न केल्याने . निकम हेच पक्षामध्ये वजनदार नेते असल्याचेे दिसून आले . आंबेगाव तालुक्यामध्ये घराणे शाहीला मोठा फटका बसण्याची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे. निकम यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये व लोकसभा निवडणुकीमध्ये निकम यांच्या राजकीय निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे दिलीपराव वळसे पाटील यांच्या नंतर निकम हेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षात बंडखोरी करून व अपक्ष उमेदवारी घेऊन निवडूनआल्याने निकम यांच्या किटलीने सगळ्यांच्या किटल्या गरम केल्या असे सध्याचे चित्र आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण बिघडल्याचे पाहायला मिळत आहे यंदाकदाचित विधानसभेला निकम यांनी पक्षा कडे उमेदवारी मागितली तर. राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण की आंबेगाव तालुका व शिरूर तालुक्यामध्ये निकम यांची तरुणांमध्ये असणारी क्रेज यामुळे निकम यांचे पारडे मोठ्या प्रमाणात जड दिसत आहे. त्यामुळे निकम हे पुढील भावी आमदार असे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकताना दिसत आहे . घराणेशाही लआ आळा घाला असे देखील बॅनर सोशल मीडियावर फिरत आहे. आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची डोकेदुखी या मुळे वाढणार आहे.. मला पाडण्यासाठी लाखो रुपयाचा बाजार मांडला. फक्त निकम पडला पाहिजे. असा आरोप निकम यांनी केला. 3 हजार रुपये मताला भाव आजतागायत कधी नाही तो आंबेगाव तालुक्यात फुटला. पण मी केलेल्या कामांची पावती माझ्या शेतकरी व कष्टकरी। तमाम कार्यकर्ते यांनी दिली .असे बोलताच निकम भाऊक झाले...