ब्रेकिंग न्यूज

*आंबेगाव तालूक्यातील आणखी एक तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

26/03/2023 12:09:01  609   वैभव काळे पाटील

आंबेगाव तालूक्यातील आणखी एक तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

आंबेगाव तालूक्यातील पिंपळगाव (घोडा) येथील तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून १०००/- रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले. 

 आंबेगाव तालूक्यातील तलाठी विलास महादेव शिगवण वय ५६ वर्षे पद सजा शिनोली पिंपळगाव तर्फे घोडा याने शेतकऱ्याच्या सातबारावर चुकलेले नाव दुरुस्त करण्याकरिता मोबदला म्हणुन १००० /- (एक हजार ) रुपयांची लाच मागणी केली होती. सदर रक्कम देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून १०००/- रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले असून लाच रक्कम स्विकारली म्हणुन त्यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास डीवायएसपी क्रांती पवार ला.प्र.वि.पुणे हे करीत आहेत