ब्रेकिंग न्यूज

वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पञकारांची पुढाकार घ्यावा....

21/03/2023 22:17:16  46   अँड. निलेश आंधळे

वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पञकारांची पुढाकार घ्यावा....

राजगुरुनगर (वार्ताहर)वनाचे व  वन्यप्राण्याचे संरक्षण,व संवर्धन करणे व त्याबाबत जनजागृती करण्यात पञकार बांधवांनी पुढाकार घ्यावा. असे मत खेड तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर यांनी अवसरीघाट येथील जागतीक वन दिना निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

   जुन्नर उपवन विभागाच्या वतीने जागतीक वन दिनाचे औचित्य साधुन  खेड व आंबेगाव तालुक्यातील सर्वच पञकारांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रविण हे होते.तर प्रमुख पाहुणे जुन्नर वन विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते.जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील,खेडचे वन परिक्षेञ अधिकारी प्रदिप रौंधळ.

मंचरच्या वन परिक्षेञ अधिकारी स्मिता राजहंस.घोडेगावचे वन परिक्षेञ अधिकारी महेश गारगोटे,

जेष्ट पञकार संतोष वळसे पाटील,

खेड तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,सुदामराव बीडकर,काकासाहेब होनराव,किरण खुडे राजेंद्र लोथे.निलेश आंधळे.सुनिल थिगळे.किशोर गिलबिले,सदाशिव अमराळे.चंद्रकांत मांडेकर,विद्याधर साळवे,मनोहर गोरगल्ले,सुषमा नेहरकर,आदीसह खेड,आंबेगाव तालुक्यातील पञकार.व वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   यावेळी मुख्य वनसंरक्षक एन आर प्रविण यांनी प्रास्तविक केले.तर जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पञकारांनी विचारलेल्या प्रश्नानां उत्तरे दिली.यावेळी खेड तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,व आंबेगाव तालुक्याचे जेष्ट पञकार विलास शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुञसंचालन मंचर विभागाचे वन परिक्षेञ अधिकारी स्मिता राजहंस यांनी सुञसंचालन केले तर खेडचे वन परिक्षेञ अधिकारी प्रदिप रौंधळ यांनी आभार मानले.