ब्रेकिंग न्यूज

धूवोली येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १२ वित शिकणाऱ्या अजय दुर्दैवी मृत

17/03/2023 22:27:02  4765   ॲड. निलेश आंधळे

धूवोली येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १२ वित शिकणाऱ्या अजय दुर्दैवी मृत्यू....

राजगुरुनगर : धुवोली, ता. खेड येथे चरण्यासाठी गेलेली जनावरे आणण्यासाठी गेलेल्या अजय चिंतामण जठर, व.व. १७ ह्याच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळालेली असून  ते घटनास्थळी दाखल होत आहेत. भीमाशंकर अभयारण्य लगत असलेल्या या भागात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. सध्या जंगलातील बिबट्या चाकण शहरात आल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याचा झालेला हल्ला दुर्दैवी मानला जात आहे. 

मनुष्याचे जंगलातील अतिक्रमण वाढले असल्याने जंगलातील हिंस्र प्राण्यांनी आपले प्रवण क्षेत्र बदलल्याचे पर्यावरण प्रेमी सांगत आहेत. असे नक्की किती जीव गेल्यानंतर प्रशासन यावर योग्य उपाययोजना करणार आहे हे पुढील काळात पाहावे लागेल.