ब्रेकिंग न्यूज

खेड तालुका पञकार संघ आयोजीत क्रिकेट सामन्यात खेड पंचायत समितीची बाजी !

16/03/2023 19:00:39  97   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

खेड तालुका पञकार संघ आयोजीत क्रिकेट सामन्यात खेड पंचायत समितीची बाजी !

राजगुरुनगर :  खेड तालुका पञकार संघाच्या वतीने रविवार दिनांक 12/03/2023 रोजी महसुल विभाग खेड,पंचायत समिती खेड,खेड पोलीस स्टेशन,राजगुरुनगर नगरपरिषद व खेड तालुका पञकार संघ याच्या मध्ये मर्यादित षटकांचा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

    या स्पर्धेचे उद्घाटन खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण याच्या हस्ते.करण्यात आले.या प्रसंगी खेड पोलीस स्टेशनचे पी आय राजकुमार केंद्रे,उपजिल्हाधिकारी हरेश सुळ,नायब तहसिलदार मदन जोगदंड, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, नगर परिषद लेखा अधिकारी  विकास वाघमारे,  खेड तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,जेष्ठ पञकार एकनाथ सांडभोर  पी.एस आय भारत भोसले,जेष्ठ महिला पञकार वनिता कोरे, पोलिस हवालदार संतोष घोलप, माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे,उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे.सचिव किरण खुडे.माजी अध्यक्ष राजेंद्र लोथे,कार्याध्यक्ष संजय शेटे, वनिता ताई कोरे आदी मान्यवर व खेळाडुंच्या उपस्थित पार पडले.

या वेळी झालेल्या सामन्यात खेड पंचायत समिती संघाने अंतिम सामन्या जिंकुन प्रथम क्रमांक मिळविला तर खेड महसुल विभागाला उपविजेता मान्य मिळुन द्वितीय क्रमांक मिळाला.तर तृतीय क्रमांक खेड पोलीस स्टेशने तर चतुर्थ क्रमांक खेड पञकार संघाने तर पंचम क्रमांक राजगुरूनगर परिषदेने पटकावला.