संतोषनगर येथे कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा....
वाकी : संतोषनगर (ता. खेड) येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून जवळपास दीड-दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहण व देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा दि. २४ ते २७ जानेवारी या चार दिवसांत अनेक धार्मिक विधी कार्यक्रम आणि कीर्तनसेवेने संपन्न होणार आहे.
संतोषनगर ग्रामस्थांच्या एकीतून भव्य देखणे सुंदर मंदिर उभारले असून, मंदिरात श्री भैरवनाथ महाराज, जोगेश्वरीमाता, गणपती, श्री विठ्ठलरुख्मिणी व शिवलिंग या देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून मंदिरावर महंत तिरयोगी गणेशनाथजी बाबा भीमाशंकर त्रिंबकेश्वर यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे.
मंगळवारी (दि. २४) देवतांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक होणार असून, नवीन मूर्तीना दशविधी स्नान, जलाधिवास, मूर्तीचे शुद्धीकरण, धान्य अधिवास, मंदिराची विविध वास्तुशांती, होमहवन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (दि. २५) रात्री हभप ज्ञानेश्वर माउली पठाडे (कर्जत), गुरुवारी (दि. २६) रात्री हभप दयानंद महाराज कोरेगावकर, तर शुक्रवारी (दि. २७) रात्री हभप प्रकाश महाराज साठे यांची कीर्तनसेवा होणार आहे. हरिपाठ यासह परिसरातील गावचे अनेक भजन मंडळांचा दररोज हरिजागर कार्यक्रम आहे.
असा असेल कार्यक्रम.....
मंदिराचा कलशारोहण धार्मिक सोहळा कार्यक्रमाला खासदार, आमदार, जिपचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, राजगुरूनगर बँकेचे संचालक, अनेक पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संतोषनगर ग्रामपंचायत पदाधिकारी श्री भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट, संतोषनगर व ग्रामस्थांनी केले आहे. अशी माहिती प्रसिध्द वकील, सुभाषराव कड पाटील व विक्रम कड पाटील यांनी पुणे ब्रेकिंग न्युज शी बोलताना दिली.