ब्रेकिंग न्यूज

जिल्हा परिषद शाळा वडगाव आनंद मध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी*

21/08/2022 21:03:28  156   शुभम दळवी

*जिल्हा परिषद शाळा वडगाव आनंद मध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी*

        शनिवार दि.20/8/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद मध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी झाली. विद्यार्थी सुंदर अशी राधाकृष्ण वेशभूषा करून दिमाखात आले होते. यावेळी गोविंदा गाण्यावर मुलांनी मनमुराद नृत्य सादर केले, त्यानंतर डोळे बांधून  दहीहंडी फोडणे हा खेळ खेळत मुलांनी खूप आनंद लुटला,त्यानंतर मनोरा करून दहीहंडी फोडण्यात आली, या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री अविनाश चौगुले,सदस्य श्री डी बी वाळुंज सर , मुख्याध्यापक श्री सुनील ठिकेकर, शिक्षक सौ वृषाली कालेकर ,सौ.संगीता कुदळे, सौ मनीषा इले तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.