ब्रेकिंग न्यूज

"संत निरंकारी मिशन तर्फे चिंचोली (कोकणे) येथे रविवार, दिनांक २६ जून रोजी 'भ

14/06/2022 08:47:46  223   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

"संत निरंकारी मिशन तर्फे चिंचोली (कोकणे) येथे रविवार, दिनांक २६ जून रोजी 'भव्य रक्तदान शिबिरा'चे आयोजन...!"

*घोडेगाव* (पुणे) : संत निरंकारी मिशन तर्फे चिंचोली (कोकणे) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, दिनांक २६ जून रोजी सकाळी ०९ ते ४.३० यावेळेत संपन्न होईल तसेच मिशनच्या माध्यमातून दरवषी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व स्वच्छता अभियान, नेत्र सह आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करीत असतो. मिशनच्या भक्तांसाठी निष्काम सेवा भावनेने केले जाणारे रक्तदान हे आधीपासूनच जनकल्याणाचे एक अभिन्न अंग बनुन राहिले आहे. युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचे कथन *'रक्त नाड्यांमध्ये वहावे, नाल्यांमध्ये नको'* हा संदेश मिशनच्या अनुयायांनी निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात *निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज* यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात जवळपास ३० रक्तदान शिबिरांचे आयोजन करून *७ ते ८ हजार रक्तपिशव्या* संकलित केल्या जातात व *आत्तापर्यंत मिशनच्या माध्यमातून १२ लाख हुन अधिक रक्त पिशव्या संकलन* आत्तापर्यंत केलेले आहे. या शिबिरात  मिशनचे भाविक भक्तगण मोठ्या उत्साहाने भाग घेतील. रक्त संकलित करण्यासाठी *ससून रक्तपेढी & यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी* यांच्या डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. मिशनचे सेवादार आजूबाजूच्या परिसरातील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण करत आहेत, या शिबिरांचे आयोजन संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा *"संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन"* च्या माध्यमातून केले जाणार आहे.

 

युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी नेहमीच समाज कल्याण कार्यांच्या प्रति निरंतर प्रयासरत  राहिले. त्यांनी एका बाजूला सत्याचा बोध करून मानवमात्राला सर्व प्रकारच्या भ्रमातून मुक्त केले तर दुसऱ्या बाजूला नशाबंदी व साधे विवाह यासारख्या सामाजिक सुधारणांचा पाया घातला. त्यांनी मिशनचा संदेश केवळ भारतातच नव्हे तर विदेशांमध्येही पसरविला. परिणामी आज *विश्वभरात 60 पेक्षा* अधिक देशांमध्ये मिशनच्या शेकडो शाखा स्थापन झालेल्या आहेत ज्यांच्या माध्यमातून सत्य, प्रेम व मानवतेचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविला जात आहे. म्ह्णून घोडेगाव पंचक्रोशीतील सर्वांना या मानवतेच्या कार्यात योगदान हेतू सादर आमंत्रित करितो, अशी माहिती स्थानिक घोडेगाव शाखेचे प्रमुख *अजित महाराज कोकणे* यांनी दिली तसेच सर्व रक्तदात्यासाठी चिंचोली समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नाष्टा व जेवणाची सोय करण्यात येणार आहे.