ब्रेकिंग न्यूज

चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात -घातलेली नोंद रद्द करण्याची दाख

07/06/2022 16:03:30  4804   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

-घातलेली नोंद रद्द करण्याची दाखवत होते भीती-

सातबारा वरील नोंद घालण्यासाठी शेतकऱ्याकडुन ४ हजार रुपयांची रक्कम घेताना खेड तालुक्यातील वाडा विभागाचे तलाठी एस एम अमोलिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरूनगर येथील कार्यालयात मंगळवारी(दि ७) रंगेहात ताब्यात घेतले.खेड तालुक्यातील गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.दोन महिन्यांपूर्वी एका तलाठ्याला किरकोळ रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

वाळद येथील जमीन खरेदी विक्री नंतर होणाऱ्या नोंदी घालण्यासाठी एका स्थानिक शेतकऱ्या कडुन तलाठी अमोलिक यांनी काही रक्कम मागितली होती. नोंद घालण्यात आली. मात्र ठरलेल्या पैकी उर्वरित चार हजार रुपये द्यावेत म्हणून तलाठी शेतकऱ्याला फोन करून त्रास देत होते. पैसे न दिल्यास घातलेली नोंद रद्द करू अशी धमकी पण देत होते. अखेर शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. प्लॅन झाल्यावर मंगळवारी ही रक्कम देण्यासाठी शेतकरी राजगुरूनगर येथे असलेल्या वाडा सर्कल व तलाठी कार्यालयात आला.येथे दोघेही उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्या कडुन ही रक्कम स्विकारली.