ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड भाजपातील आयाराम पुन्हा करणार निष्ठावंताचा कडेलोट

03/03/2022 00:39:33  79   दळवी सुमित

 - संघर्षला होणार चऱ्होलीतून सुरुवात

पिंपरी विशेष संपादकीय लेख :: पिंपरी चिंचवड शहर भाजपावर सध्या पूर्णपणे आयारामांनी कब्जा केला आहे. ज्या 

जुन्या जाणत्या निष्ठावंत यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचे रोपटे लावले ते टिकवले आणि वाढवले त्यांनी सत्तेच्या लालसा पोटी पक्षश्रेष्ठींनी बाजूलाच नव्हे तर हद्दपार केल्याचे गतवेळी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आले आता पुन्हा पाच वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढली आहे.

गतवेळी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपात झालेल्या भरतीचे बोलके उदाहरण एका जाहिरातीमध्ये अत्यंत उत्तम प्रमाणे दाखवले होते

मध्यंतरी टीव्हीवर एक जाहिरात येत होती त्यामध्ये एका भरलेत एकावर एक टोमॅटोचे दाबून भरले असे दाखवले होते या बरणीत क्षमतेपेक्षा जास्त टोमॅटो बसवले 

मग ते कसे फुटतात हे दाखवण्याचा अत्यंत प्रभावी प्रयत्न केला होता याचा

 प्रलय आत्ता भारतीय जनता पार्टी मध्ये येऊ लागला आहे जास्त बोजा झाल्यामुळे अनेक टोमॅटो फुटली तर काही खराब झाली आहेत तर किती चांगली राहिली याची शाश्वती कोणालाही नसल्याने नेमक्या टोमॅटोचं करायचं काय? असा प्रश्न शहर भाजपाच्या लोकांना पडला आहे

खराब झालेल्या टोमॅटोचा फटका खऱ्या अर्थाने पुन्हा निष्ठावंतांना बसण्याची अधिक शक्यता आहे आयारामांची भरती झाल्याने त्यांना सर्वाधिक फटका वर्षानुवर्ष इमानेइतबारे काम करून देखील मिळत आहे गतवेळी निवडणुकीदरम्यान निष्ठावंतांना डावलून आयाराम गयाराम यांना संधी देण्यात आली, तर पदे  वाटण्यात देखील अधिक संधी आयाराम गयाराम यांना देण्यात आली आता पाच वर्ष पूर्ण झाल्याने गत वर्षीच्या निवडणुकीतील तिकीटवाटपाची पुनरावृत्ती होणार आहे त्याची झलक सध्या चऱ्होली प्रभागांमध्ये पाहण्यास मिळत आहे.

चऱ्होली परिसरातील जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून शैला मोळक यांची ओळख आहे जुन्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आवर्जून उल्लेख होतो , मात्र भाजपा मध्ये येणाऱ्या आयाराम यांच्या लाटेचा सर्वाधिक फटका हा जुन्या कार्यकर्त्या शैला मोळक यांना बसला गतवेळी सुरुवातीला मोळक यांना भारतीय जनता पार्टी कडून तिकीट 

नाकारण्यात आले होते, मात्र त्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांच्या मध्यस्थीने टिकीट आणले अत्यंत हिरीरीने निवडणूक लढवली आणि 7 हजाराहून अधिक मते घेतली मात्र त्यांचा पराभव 1100 मताने झाला, हा पराभव काही आया रामांनी घडून आणला अशी आजही परिसरात चर्चा आहे मोळक यांचे खच्चीकरण करायचे होते म्हणून बंडखोर उमेदवार 

उभा करण्यात आला होता, त्या बंडखोर उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या वतीने साथही देण्यात आली आणि मोळक यांचा पराभव करण्यात आला, 

बंडखोर उमेदवाराला 2500 हजाराहून मते मिळाली व मोळक यांचा जाणीवपूर्वक पराभव घडून आणला, 

त्या बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी कोणाची ताकद होती हे मात्र लपून राहिले नाही मोळक यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांनी मात्र पक्षाशी गद्दारी केली नाही  त्या आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

गतवेळी सत्तेच्या लालसेपोटी इतर पक्षातून आलेल्या अनेकांना संधी देणाऱ्या भाजपलाच टार्गेट करत यातील अनेक जण बाहेर पडत आहेत यामुळे या पक्षाची प्रतिमाही मलीन होत आहे,

मात्र त्यातूनही धडा न घेता भाजपाच्या शहर पातळीवरील नेतृत्वाने निष्ठावंत वरील अन्यायाची भूमिका कायम ठेवत पुन्हा एकदा आयाराम साठीच पाय उघड्या यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे

या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीतही 

चऱ्होली प्रभागातून मुळक यांचा विजय निश्चित होऊ शकतो मात्र त्यांना पुन्हा एकदा नाट लावण्याचा कार्यक्रम देखील आहे आयाराम मुळे होऊ शकतो.

मोळक यांच्यामध्ये क्षमता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांच्या साठी भाजपाच्या काही दिग्गज कार्यकर्त्यांनी पायघड्या अंथरल्याने पाहण्यास मिळत आहे.

मोळक यांच्या ऐवजी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करू पाहणाऱ्या विनया तापकीर यांना तिकीट देण्याचा घाट घालण्यात येत असल्याने आयारामांना अति महत्त्व देत निष्ठावंताचा दूर फेकण्याची भाजपाची परंपरा इथेही कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे यापुढे जुन्या निष्ठावंत यामध्ये खदखद वाढू लागली आहे 

ही खदखद अशीच वाढत राहिली तर शहर भाजपामध्ये लवकर मोठे बंड  निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

निष्टपेक्षा केवळ संख्येला महत्त्व देत 

केवळ सत्ता काबीज करणे आणि त्यातून स्वतःचे किसे भरण्याचे  सुरू आहे,या गोष्टीचा या वेळी भाजपाला मोठा फटका बसू शकतो.या साठी गरज आहे ती निष्ठावान  यांनी एक जुटीने आयारामाचा मुकाबला करणे!