खडकवासला प्रतिनिधी :: शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा खडकवासल्याचे उपसरपंच संदीप मते यांच्यावतीने प्रभाग 53 मधील माता माता-भगिनीसाठी मोफत देवदर्शन यात्रा आयोजित केली आहे तरी सर्व महिला भगिनींनी या देवदर्शन यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान संदीप पाटील मते यांनी केले आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, अनेक दिवस कोरोनाच्या महामारी मुळे मंदिरे बंद होती त्यामुळे माता-भगिनींना कुठे जाता येता येत नव्हते याच पार्श्वभूमीवर महिला भगिनींच्या सेवेसाठी तुळजापूर ,अक्कलकोट ,पंढरपूर, व शिखर शिंगणापूर, या ठिकाणची यात्रा आयोजित केली आहे तरी महिला भगिनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान मते पाटील यांनी केले.
खडकवासला येथे संदीप मते पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये आपली नाव नोंदणी करावी.