भोसरी : बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती स्थानिक भोसरी शांतीनगर वसाहत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची पूजा-अर्चना करून प्रसादाचा भोग व नैवेद्य दाखविण्यात आला.
तसेच शांतीनगर वसाहत
भागातील राहणाऱ्या सर्व नागरिकांनी यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला फुले वाहून दर्शन घेतले.
थोर समाजसुधारक, क्रातीकारी श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक जालिंदर बापू शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेवक जालिंदर बापू शिंदे, युवराज दादा आढे, धनराज राठोड, शिवाजी राठोड, चंदू राठोड, राठोड परशुराम, राठोड गोपाल ,राठोड प्रकाश, राठोड ,महेश चव्हाण ,सोमशंकर राठोड,अर्जुन राठोड ,बळीराम राठोड, रवी पवार, अनिल पवार शांतीलाल राठोड, प्रमोद राठोड आदी उपस्थित होते.
भागातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.