ब्रेकिंग न्यूज

*आळेफाटा येथे उमाजी राजे नाईक स्मृतिदिन उत्साहात पार पडला

03/02/2022 16:17:38  488   शुभम दळवी

*आळेफाटा येथे उमाजी राजे नाईक स्मृतिदिन उत्साहात पार पडला*

    दि.०३.  आज आळेफाटा येथील मुख्य चौकात छञपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन देण्यात आले.

           सशस्त्र क्रांतीचे निर्माते तसेच ज्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारून जो एल्गार उगारला होता ज्यांच्यामुळे ब्रिटिश सरकार पुरते हैराण झाले होते  असे प्रतिपादन शिवजन्मभूमीचे माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी केले.

याप्रसंगी शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ज्याप्रमाणे उमाजी नाईक यांनी संघटित होऊन संघर्ष केला त्यांच  अनुकरण करून आपण देखील सर्वांनी एकजूट होउन अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे असं संबोधित केल.

पंचायत समिती सदस्य जीवनशेठ शिंदे यांनी आलेला सर्व मान्यवर मान्यवरांचा नामोल्लेख करून सन्मान केला ,त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र व वंदे मातरम घेऊन मानवंदना देण्यात आली.

या अभिवादन प्रसंगी गणेश शेठ कवडे,शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश आण्णा काकडे, आळे गावचे सरपंच प्रितम शेठ काळे उपसरपंच विजू सर कुऱ्हाडे, आंबी दुमाला चे सरपंच जालिंदरशेठ गागरे, सामजिक कार्यकर्ते सचिन शेठ वाळुंज व विजू भाउ देवकर तसेच विपुल येलमर,गणेश गोफणे, भाउ मोरे, निलेश रायकर, बबलू भंडलकर, दिनेश कुऱ्हाडे, धोंडीभाऊ भंडलकर,कळमजाई माता युवा प्रतिष्ठान, अंबिका माता मित्र मंडळ राम वाडी, बजरंग दल आळेफाटा चे अनेक कार्यकर्ते अभिवादन देण्यासाठी उपस्थितीत होते.