खेड मध्ये कुपोषित बालकांना आमदार मोहितेंकडून पोषण आहार वाटप ......
खेड तालुक्यातील प्रकल्प १ व २ मधील सॅम / मॅम बालकांना तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. दिलीपशेठ मोहितेपाटील यांच्या कडुन विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड यांच्या समन्वयाने पौष्टिक आहार व औषधेता लुक्यातील सर्व सुमारे(२००)सॅम/मॅम बालकांना आज मा. आमदार साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार मोहिते सौ सुरेखाताई मोहिते विद्युत सनियंत्रण समिती सदस्य रविंद्र गायकवाड प्रकल्पातील सी डी पी ओ मा. वाघमारेसर, विस्तार अधिकारी लोंढे साहेब व बांगर साहेब अक्षय पवार सेविका-मदतनीस, लाभार्थी व सुपरवायझर खामकर मॅडम उपस्थित होते.
येत्या काळामध्ये तालुका कुपोषण मुक्त करू त्यासाठी लागेल ती मदत करायला मी तयार आहे अशी माहिती आमदार मोहितेंनी बोलताना दिली सर्व लाभार्थींनी आमदारांचे आभार मानले.