किवळे येथे किल्ले बनवा स्पर्धेचा, बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न...
हिंदूवीर प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद, ग्रामस्थांनी केल्या भावना व्यक्त...
किवळे- प्रतिनिधी 26/01/2022
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे, तसेच हिंदवी स्वराज्यातील गडकिल्ले व त्या ठिकाणचा इतिहास येणाऱ्या युवा पिढीला आदर्शवत ठरावा, किल्ल्यांचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
हिंदूवीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून मागील 2021 वर्षी, दिवाळी सणामध्ये ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. तेव्हाच स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले होते. किल्ले परीक्षण करण्यासाठी गडकिल्ले अभ्यासक स्वप्नील घुमटकर व सौरभ दौंडकर हे परीक्षक लाभले होते.
या स्पर्धेचा निकाल 73 वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आला, त्याचवेळेस विजेत्या स्पर्धकांना, मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण ही केले गेले.
प्रथम क्रमांक हा श्रेयश संतोष साळुंके, द्वितीय क्रमांक ऋतुराज रविंद्र कदम व सुजल चिंतामण कदम, तृतीय क्रमांक सोहम अरुण शिवले, यांचा आला तर उत्तेजनार्थ प्रथमेश संतोष म्हसे, आयुष चांगदेव म्हसे यांना बक्षीस देण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विध्यार्थी, शिक्षक व हिंदूवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते.
ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र सेना ह्या हिंदुत्ववादी संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राऊत, प्रास्तविक भास्कर शिवले, आभार स्वप्नील साळुंके यांनी मानले.