मलठण येथे राजुशेठ गावडे यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेट भागातील विकासकामांचा पाठपुरावा पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात केल्याने शिरुर तालुक्यातील बेट भागाच्या विकासासाठी पत्रकारांचे सर्वाधिक योगदान असल्याचे गौरवोद्गार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केले आहे.पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांना एकत्रित करून त्यांना सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
पहिले मराठी वृत्तपत्राचे जनक , दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्रदादा गावडे तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी पत्रकार हेमंत चापुडे .साहेबराव लोखंडे.विजय थोरात. अरुण मोटे योगेश भाऊ लंघे, पत्रकार दत्ता उनवणे,युनुस तांबोळी,दत्ताभाऊ गावडे,नवनाथ रणपिसे,प्रविण गायकवाड, संजय बारहाते.भरत घोडे, शहाजी पवार, शरिफ तांबोळी,शरिफ मोमीन,रुपेश चापुडे,शौकत शेख, योगेश भाकरे, शरद राजगुरू, मनिषा राजगुरू,सागर रोकडे, अमित मुलाणी, योगेश पडवळ,सुभाष शेटे आदि प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सरपंच बिपीन थिटे,नाना फुलसुंदर , मुकुंद नरवडे, रामा गायकवाड, बाळासाहेब डांगे, संदीप गायकवाड, बाजीराव उघडे, जानकु मुंजाळ, फिरोज आतार, संताजी तिखुळे, विलास रोहीले, सोनभाऊ मुसळे, फुलचंद खाडे उपस्थित होते.
यावेळी गावडे म्हणाले,शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे हे गेली ५९ वर्षं राजकारण व समाजकारणात सक्रीय असून त्यांना जसे जनतेचे पाठबळ मिळाले तसेच पत्रकारांनीही विकासाभिमुख बातम्या प्रसिद्ध करुन गावडे साहेब यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे.लोकशाहीचा हा चौथा स्तंभ समाजाभिमुख कामांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो म्हणून आपल्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.या वेळी पत्रकार सुभाष शेटे यांनी देखील निवडून मध्ये बातम्या देऊन तुम्हाला सहकार्य करु असे सांगितले..
अनेक वर्षानंतर असे पत्रकार दिनाच्या निमित्ताने बेट भागातील सर्वच पत्रकारांना एकत्रित करून त्यांचा सन्मान झाल्याची भावना यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी व्यक्त करीत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्रदादा गावडे यांना धन्यवाद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. सध्या बेट भागात रस्त्याची दुरअवस्था. निकृष्ट दर्जाचे रोड जिल्हा परिषद व पंचायत समिती बांधकाम विभाग करत आहे. शेतकरी वर्गाला वीजपुरवठा व अष्टविनायक महामार्ग अपुर्ण काम ह्या मुळे जनसामान्यांना मोठा त्रास होतो आहे. या कडे राजकीय पद अधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे असे. योगेश लंघे यांनी सांगितले. काही ठिकाणी तर 20 वेळा नारळ फोडून पण कामे झाली नाही. तर काही ठेकेदार हे राजकीय पक्षाशी संबंधित राहुन निकृष्ट दर्जाच्या कामाचा सपाटाच बेट भागात लावला आहे. आता राजुशेठ गावडे या कडे लक्ष देऊन उत्तम कामे करतीलच त्याच्या कडून तरुणांना खूप अपेक्षा आहे असे मत योगेश लंघे यांनी मांडले..
उपस्थितांचे स्वागत विजय थोरात,प्रस्ताविक प्रविण गायकवाड,सुत्रसंचालन संदीप गायकवाड तर आभार संजय बारहाते यांनी मानले .