ब्रेकिंग न्यूज

शिरूर प्रीमियर लीग चा फायनल चा थरार आज रंगणार.

09/01/2022 09:41:38  747   योगेश लंघे

शिरूर प्रीमियर लीग चा फायनल चा थरार आज   रंगणार.

 

 

पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे.

असे पै.मल्हारी आप्पा गव्हाणे  ‌,,(अध्यक्ष शिरुर क्रिकेट असोसिएशन)यांच्या प्रेरणेतून चालू झालेली शिरुर प्रीमियर लीग चा फायनल चा थरार आज सणसवाडी येथे रंगणार आहे.

चार दिवसापासून चालू झालेले ह्या महासंग्राम मध्ये प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला यूट्यूब च्या माध्यमातून 5 कॅमेरा द्वारेलाइव्ह प्रक्षेपण पुणे क्रिकेट करत आहे. आज मेघा फायनल असल्यामुळे शिरूर नेरली मैदान रक्षकांनी तुडुंब भरल्याचे पाहायला मिळणार असल्याचे जाणकार सांगतात शिरूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आले आहे. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पै मल्हारी (आप्पा) गव्हाणे (अध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन) 

श्री यशवंत दादा पाचंगे (उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन.श्री राहुल दादा पवार (उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन ).ग्रामपंचायत सदस्य जातेगाव बुद्रुक श्री लक्ष्मण दादा गव्हाणे (सचिव शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पुणे जिल्हा माहिती सेवा समिती) श्री सागर भाई दरेकर खजिनदार शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन उपसरपंच सणसवाडी श्री सागर गायकवाड खजिनदार शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन माजी ग्रामपंचायत सदस्य तळेगाव ढमढेरे श्री प्रवीण गव्हाणे. सदस्य शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन उद्योजक. त्यांच्या खांद्यावर आहे शिरूर प्रीमियर लीग चा फायनल मध्ये 

1)सायमा फार्म तांदळी संघ.

2) ग्रामविकास प्रतिष्ठान 

3)मानसिंग भैय्या पाचुंदकर राजनगाव 

4)महाराजा फायटर्स कोरेगाव भिमा

ह्या 4 संघांमध्ये आज फायनल चा थरार रंगणार आहे.

फायनल चा थरार चा आज पहीला सामना. मानसिंग भैया पाचुंदकर राजणगाव vs महाराजा फायटर्स कोरेगाव भिमा यांच्या मध्ये रंगणार आहे. तर दुसरा सामना सायमा फार्म तांदळी  vs ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या मध्ये रंगणार आहे.  सामना ठिक 11 वाजता चालू होणार असून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे..