शिरूर प्रीमियर लीग च्या खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण 5 जानेवारी ते नऊ जानेवारी ला रंगणार क्रिकेटचा महाकुंभमेळा
शिरूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पै मल्हारी (आप्पा) गव्हाणे यांच्या स्वप्नातून साकार झालेल्या शिरूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा खेळाडूंची लिलाव प्रक्रिया मोठ्या थाटामाटात पार पडली खेळाडूंचा लिलाव प्रक्रिया मध्ये वाघोली राहुल सातव तर सनस वाडी चा लोकल प्लेयर राहुल सोनवणे यांची सर्वाधिक बोली लागली केली शिरुर प्रीमियर लीगमध्ये एकूण 16 संघ असून मध्ये कासारे गावचा कासारी इलेव्हन, वाडा गावचे ग्रामविकास प्रतिष्ठान ,पारोडी गावचे जय दादा शिंदे स्टार इलेव्हन, कोरेगाव भीमा चा महाराजा फायटर्स ,रांजणगाव गणपती चे मानसिंग भैया पाचुंदकर स्टार इलेव्हन, श्री घनोबा वॉरियर्स धानोरे, सागर आप्पा किंग इलेवन मलटण, शिवशंभु वॉरियर्स जातेगाव ,रविदादा इलेव्हन महाराजा प्रतिष्ठान अण्णा पूर, सणसवाडी फायटर्स सणसवाडी, शिरसाट स्पोर्ट्स केंदूर, संकल्प पोलीस इलेव्हन शिरूर, जय गणेश फायटर्स वाजेवाडी, सायास फार्म तांदळी, डिग्रस फायटर्स डिग्रज वाडी, सनी इलेव्हन शिक्रापूर, अशा सोळा संघांनी शिरूर प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला असून यामध्ये शिरूर तालुक्यातील दहा टॉप च्या लिलाव झालेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे एक नंबर ला राहुल सोनवणे 51 हजार रुपये दोन नंबर गणेश गोरखे 42 हजार पाचशे रुपये तीन नंबर गणेश शिंदे 41 हजार 500 रुपये चार नंबर तेजस शिवले41 हजार रुपये पाच नंबर गौरव पुराणिक 39 हजार रुपये सहा नंबर अविनाश गावडे 37 हजार रुपये 7 नंबर संदीप गिरे पस्तीस हजार पाचशे रुपये आठ नंबर दिपक चौगुले 34 हजार पाचशे रुपये नंबर नऊ किरण बांगर33 हजार रुपये हजार रुपये नंबर 10 संकेत फराटे 32 हजार पाचशे रुपयेअशा प्रकारे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली असून शिरूर तालुक्यामध्ये या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे शिरूर तालुक्यामध्ये क्रिकेट महर्षी म्हणून ओळख असणारे

पै मल्हारी (आप्पा)गव्हाणे
यांनी शिरूर तालुक्यामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांसाठी मोठे व्यासपीठ उघडल्याने तालुक्यातील तरुण मोठे खुश आहेत . या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पै मल्हारी (आप्पा) गव्हाणे (अध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन)
श्री यशवंत दादा पाचंगे (उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन.श्री राहुल दादा पवार (उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन )ग्रामपंचायत सदस्य जातेगाव बुद्रुक श्री लक्ष्मण दादा गव्हाणे (सचिव शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पुणे जिल्हा माहिती सेवा समिती) श्री सागर भाई दरेकर खजिनदार शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन उपसरपंच सणसवाडी श्री सागर गायकवाड खजिनदार शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन माजी ग्रामपंचायत सदस्य तळेगाव ढमढेरे श्री प्रवीण गव्हाणे सदस्य शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन उद्योजक ह्या आयोजकांच्या देखरेखीखाली सदर क्रिकेट स्पर्धा पार पडणार असून. सदर स्पर्धा पुणे क्रिकेट वर लाईव्ह कव्हरेज होणार असून 6 कॅमेरा द्वारे ही स्पर्धा जगभर आपणास पाहायला मिळणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेची उत्सुकता तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना असल्याचे दिसते.