01/12/2021 21:27:34
1013
वैभव काळे पाटील
कळंब गावच्या हद्दीत दळवीमळा येथे पुणे नाशिक हायवेवर काल दिनांक ३०/११/२०२१ रोजी रात्री ८:४५ वा.चे सुमारास अशोक लेलंड ट्रक MH १४ HQ ०४४१ वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वरील ट्रक भरधाव वेगात, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने, निष्काळजी पणाने चालवून मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने थिगळस्तळ, खेड येथिल राजेश अशोक जाधव वय २५ वर्षे त्यांची मोटारसायकल MH १२ BZ ८५९६ वरून जात असताना या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची पत्नी निशा अशोक जाधव वय २२ वर्षे ही गंभीर जखमी झाली आहे.
सदर ट्रक चालक हा अपघात स्थळावरून जखमींना कुठलीही मदत न करता निघून गेला असून त्याच्यावर मंचर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.निरीक्षक होडगर व पो. हवा.साबळे हे करत आहेत.