ब्रेकिंग न्यूज

लॉकडाऊन परवडणारे नाही शहर प्रशासनाने दखल घ्यावी पार्थ पवारांचे ट्वीट

01/12/2021 16:33:51  88   दळवी सुमित

पिंपरी प्रतिनिधी :: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंट या भयावह विषाणूने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या विषाणुच्या धोक्याचा विचार करता केंद्र सरकारने (Central Government) सावधानतेच्या सुचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर लक्षकेंद्रित केल असतानाच काल (मंगळवारी) आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण (Corona positive) झाली. तर, आता पिंपरी चिंचवड (PCMC) शहरात नायजेरियातून (Nigeria) आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात नायजेरियातून आलेले 2 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट असलेल्या 12 देशामध्ये नायजेरियाचा समावेश नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असं देखील महापालिका प्रशासनाकडून (PCMC administration) सांगण्यात आलं आहे. (Omicron Variant) नायजेरियातून आलेल्या त्या दोघांना जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनियन सिक्वेन्सला (Genius Sequence) तपासासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नायजेरियातून 25 नोव्हेंबर रोजी पिंपरी- चिंचवड शहरात आई आणि मुलगी आल्या होत्या. त्यादिवशीही दोघांनी केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तर, महापालिकेने 29 नोव्हेंबरला केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. त्यानंतर त्यांचा मुलगा देखील पॉझिटिव्ह (Corona positive) आला आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिका अलर्ट झाले पाहिजे लॉक डाऊन हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही असे ट्विट युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे.