ब्रेकिंग न्यूज

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी अंकुश लांडे यांची तर राष्ट्

01/12/2021 09:49:08  166   वैभव काळे पाटील

पुणे प्रतिनिधी ::: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पदी राजेंद्र कोंढरे यांची निवड यांची निवड झाल्याने केला सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्रजी कोंढरे साहेब यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला, यावेळी उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड, आणि मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित जिल्हा कार्यकारणी लोकशाही मार्गाने निवड प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये पुणे जिल्हाध्यक्ष पदी अंकुशराव लांडे, उपाध्यक्ष विठ्ठल घावटे व वामन बाजारे, सरचिटणीस भास्करराव पुंडे, कोषाध्यक्ष अनिल गावडे, सहकोषाध्यक्ष संपत ढोरे, संघटक मच्छींद्र तोत्रे, शासकीय योजना मार्गदर्शक म्हणुन जूबेरभाई शेख यांची निवड झाली आहे. तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी शैलाजा दुर्गे, उपाध्यक्ष मालती थोरात व वर्षाताई काळे, सरचिटणीस संगीता शेवाळे, चिटणीस जिजाबाई दुर्गे, कोशाध्यक्ष क्रांतीताई कराळे व संघटक म्हणुन वैशाली गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली (फादर बॉडी). तसेच युवक बॉडी पुणे जिल्हाध्यक्ष पदी स्वप्निल डोंगरे, कार्याध्यक्ष अविनाश जाधव, उपाध्यक्ष अभिषेक शेळके व विशाल निघोट सरचिटणीस म्हणुन योगेश तोडकरी यांची निवड झाली आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री प्रकाशजी देशमुख, राष्ट्रीय चिटणीस श्री प्रमोदजी जाधव, पुणे शहरध्यक्ष गुलाबराव गायकवाड, शहर युवकध्यक्ष युवराज देसले, शोभाताई पाचंगे, गणेश मापारी, भाग्यश्री बोरकर, दादासाहेब भोंडवे यांच्या उपस्थितीत सर्व सभासदांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पुणे जिल्ह्यामधील तळागाळामध्ये मरठा महासंघाचे काम पोहचविण्याचे तसेच गाव तिथे शाखा आणि गाव तिथे उद्योजक घडविण्याचा आव्हान सर्व पदाधिकारी यांना केले. आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक व सारथीच्या माध्यमातून गरिब विद्यार्थी घडविण्याचे देखिल आव्हान केले. यावेळी पाचही तालुक्यातील पुरूष तसेच महिला कार्यकारणी वर युवक कार्यकारणी मधील साधारण १५० नुतन पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो व पुढचे पाऊल पुस्तक तसेच मराठा महासंघाची भगवी पट्टी प्रदान करुन सर्वाचा सत्कार व सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सूत्रसंचलन पुणे शहराध्यक्ष गुलाबराव गायकवाड यांनी केले व आभार आंबेगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ हुले यांनी केले, ह्या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुका पदाधिकाऱ्यांनी केले.