ब्रेकिंग न्यूज

"गोपाष्टमीला गोभक्तांचा पार पडला मेळा" विश्व हिंदू परिषदेतर्फे कार्यक्रमाचे

18/11/2021 07:26:07  91   गणेश मांजरे राजगुरूनगर

"गोपाष्टमीला गोभक्तांचा पार पडला मेळा" दिनांक : पुण्यात विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्यावतीने गोपाष्टमी निमित्त रविवारी गोभक्तांचामेळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोपूजन तसेच प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण व वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कारांने गोभक्तांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. कृष्णकुमार गोयल यांनी भूषविले असून या कार्यक्रमाला साध्वी प्रीती सुधाजी महाराज आणि स्वरसम्राज्ञी मधुस्मिताजी यांचे आशिर्वचन प्राप्त झाले. आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य धर्माचार्य शंतनु रिठे महाराज आणि आत्मनिर्भर भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख श्री. माधव भांडारी यांचे ही मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभले. संपूर्ण महाराष्ट्रात गोरक्षा आंदोलन चालवणारे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री श्री. शंकररावजी गायकर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. शंकररावजी यांनी गोरक्षण, गोसंवर्धन यासंदर्भात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र गोरक्षा प्रमुख(मुंबई व गुजरात क्षेत्र) श्री. भाऊरावजी कुदळे, पांजरपोळ भोसरीचे प्रमुख श्री. ओमप्रकाश रांका, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्रचे विश्वस्त श्री. शेखर मुंदडा, इस्कॉन पुणेचे प्रमुख प्रभू श्वेतप्रदीपदास महाराज, पतंजलीचे महाराष्ट्र समिती प्रमुख श्री. बापू पाडळकर, गोविज्ञान संशोधन संस्थेचे प्रमुख श्री.राजेंद्र लुंकड, सामाजिक कार्यकर्त्या अनिता तलाठी, शि.प्र. मंडळ पुणेचे अध्यक्ष एड. नंदू फडके, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विठ्ठल जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन बागमार, राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे संयोजक श्री. विजय वरुडकर, प्रांतमंत्री श्री संजय मुद्राळे, प्रांतसहमंत्री श्री सतीश गोरडे, जेष्ठ गोरक्षक श्री पंडितदादा मोडक यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या मेळाव्यात भीमाशंकर जिल्ह्यातून 100 पेक्षाही अधिक गोरक्षकांचा आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र गोरक्षा प्रमुख(मुंबई व गुजरात क्षेत्र) श्री. भाऊरावजी कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर जिल्ह्यात "कत्तलखाना मुक्त शिवजन्म भूमी" जन चळवळ उभी राहिली आहे. ह्या परिसरात होणाऱ्या अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तली रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात प्रत्येक तहसीलदार कार्यालयांसमोर आंदोलने केली गेली होती, त्यासाठी जिल्हा गोरक्षक गणेशजी रौन्धल यांनी पुढाकार घेतला होता. भीमाशंकर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 110 पेक्षा अधिक गोवंशांना वाचवण्यात गोरक्षकांना यश आले आहे. गोभक्तांचा मेळावा कार्यक्रमात अमर ताटीया (हुतात्मा राजगुरू फाऊंडेशन), दिपक निकम (आचार्य विनोबा भावे गोसेवा संघ), दादाभाऊ जाचक (गोमूत्रयुक्त यशस्वी शेती), हभप महंत गणेश महाराज पुणेकर (माऊली कृपा ज्ञानदान, अन्नदान संस्था), अमोल भोर (मधूबन गोशाळा), संजय बुट्टे (धर्मवीर संभाजी महाराज गोशाळा), शीतलकुमार शहा (श्री पद्ममणी जैन तीर्थ पेढी) यांना विशेष सत्कार देण्यात आले. ह्याचसोबत भीमाशंकर जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करणारे पदाधिकारी नितीनजी वाटकर, संतोषजी खामकर, संदेशजी भेगडे, गणेशजी रौन्धल, निलेशजी आंधळे, गणेशजी मांजरे, प्रतिक दौंडकर, अमितजी भेगडे, महेंद्रजी अस्वले, रोहनजी निकटे यांनी विशेष सहभाग नोंदवला. तसेच येणाऱ्या काळात शिवजन्मभूमी जुन्नर कत्तलखाना मुक्त करण्यासंदर्भात निर्धार व्यक्त केला. ह्या कार्यक्रमासंदर्भातील प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे, जेष्ठ गोरक्षक मिलिंदभाऊ एकबोटे यांनी "विहिपने घेतलेला गोभक्तांचा मेळा सर्वदृष्टीने उत्कृष्ट ठरला. साधुसंतांची उपस्थिती प्रेरणादायी होती. मेळाव्यातील भाषणे जोशपूर्ण होती, त्यामुळे गोभक्तांचे रुपांतर गोरक्षकांमध्ये कधी झाले ते कळलेच नाही. प्रतिवर्षी पुण्यात असा कार्यक्रम होणे आवश्यक वाटते, गोमातेचे आणि गोरक्षणाचे महत्व सुशिक्षित पुणेकरांना कळणे महत्वाचे आहे. गोहत्येमुळे आतंकवादाला आर्थिक बळ मिळते हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे तो लोकांना कळला पाहिजे" अशी प्रतिक्रिया दिली. जिल्हा गोरक्षक गणेश रौन्धल यांनी " येणाऱ्या काळात शिवजन्मभूमी जुन्नर कत्तलखाना मुक्त करण्यासाठी सर्व स्तरातून लढा उभारत, जनआंदोलन अधिक तीव्र करणार" अशी प्रतिक्रिया दिली. हुतात्मा राजगुरू फाऊंडेशनचे अमर ताटीया यांनी "गोरक्षण, गोसंवर्धन काळाची गरज आहे सांगत, लहानपणापासून याचे संस्कार घडणे अधिक गरजेचे" अशी प्रतिक्रिया दिली.