ब्रेकिंग न्यूज

हुतात्मा बाबू गेनू जलाशय- डिंभे धरण फुल्ल....

12/09/2021 11:55:23  206   गणेश भोर मंचर

हुतात्मा बाबू गेनू जलाशय- डिंभे धरण  फुल्ल....

आंबेगाव : पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर च्या अभयारण्यात व  धरणक्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू जलाशय- डिंभे धरण आज अखेर ९५% पेक्षा जास्त भरले असून अजून पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून घोड नदी पात्रात  केव्हांही सोडण्यात येईल असे संबंधित अधिकारी यांनी फोन वरून माहिती दिली सांडव्यावरून पाणी सोडण्यात येईल. विसग॔ जसजसा धरणात येत असलेल्या विस॔रगावर अवलंबून असेल  त्याप़माने विसर्ग कमी जास्त होईल.  नदी काठच्या गावतील नागरिकांना सुचना देण्यात आल्या आहेत. आपली जनावरे लहान मुले  नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये व सव॔ नागरिकांनी काळजी घ्यावी असे पाटबंधारे विभाग व आपत्ती व्यवस्थापन कडून अहवान करण्यात येत आहे.