ब्रेकिंग न्यूज

हुतात्मा राजगुरू फाउंडेशन ने सुरू केलेल्या मुक्या जनावरांना चारा देण्याच्या

16/05/2021 11:15:49  351   अँड. निलेश आंधळे

हुतात्मा राजगुरू फाउंडेशन ने सुरू केलेल्या मुक्या जनावरांना चारा देण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद.... दोन गोशाळांना चारा पोहोच...तालुक्यातील इतरही गोशाळांना चारा देणार....

राजगुरूनगर : खेड तालुक्यात अनेक गोशाळा आहेत भाकड, आजारी पडलेल्या आणि कत्तलीपासून वाचविलेल्या गाई या गोशाळा व पांजरपोळ मध्ये सांभाळल्या जातात.वेगवेगळ्या संस्था मार्फत गाई गोशाळेत सांभाळल्या जातात. देशी गोवंशाचे संरक्षण व संवर्धन व्हावे तसेच पंचगव्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा असा यामागचा उद्देश असतो. अशा या संस्थामधील मुक्या जनावरांना उन्हाळ्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागते. ह्या गाई व गोवंश  उपाशी राहू नये म्हणून खेड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या हुतात्मा राजगुरू फाउंडेशन ने अशा गोशाळांना चारा देण्याचा मानस केला यातून आतापर्यंत विनोबा भावे गोशाळा कोयाळी(भानोबाची)  येथील गोशाळेला १० टन चारा देण्यात आला आहे. सध्या या गोशाळेत १५० पेक्षा अधिक गाई आहेत. तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्री. समर्थ गोशाळेला देखील २ चाऱ्याच्या गाड्या देण्यात आल्या आहेत. या गोशाळेत सध्या ३५ पेक्षा अधिक गाई आहेत. अजूनही २ गाड्या याठिकाणी पोहोच करणार असल्याचे फाउंडेशन च्या अध्यक्षा मनिषाताई पवळे व अमर टाटीया यांनी सांगितले. याप्रमाणेच खेड तालुक्यातील इतरही गोशाळाना चारा पुरविणार असल्याचे फाउंडेशन तर्फे सांगण्यात आले. मातृदिनानिमित्त राजगुरूनगर येथील स्व. सुवर्णमाला गुलाबचंदजी बलदोटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योजक श्री. राजुशेठ बलदोटा व श्री. दिनेशशेठ बलदोटा व परिवार,  सौ. चमकबाई, झुंबरलालजी, जयकुमार, अजयकुमार, विनयकुमार एवं बलदोटा परिवार, डिंपल बाफना, श्रीकांत गरुड यांनी मुक्या जनावरांना चारा देण्यासाठी मदत देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुणे येथील निखिल कुवाड व त्यांच्या सौभाग्यवती सायली निखीलजी कुवाड, अक्षय कुवाड व त्यांच्या सौभाग्यवती सुप्रिया अक्षयजी कुवाड, हडपसर येथील स्व. महेश राणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, राजगुरुनगर येथील लायन्स क्लब चे अध्यक्ष मिलिंदशेठ आहेर, सिद्धीविनायक ट्रॅव्हल्स चे गणेशभाऊ देव्हरकर, मोती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज सावताडकर व त्यांच्या सौभाग्यवती स्वाती मनोज सावताडकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश मुकुंद पिंगळे, सुनील भगवान इंगळे व त्यांच्या सौभाग्यवती वैशाली सुनील इंगळे, डॉ. आशिष गुजराथी सर, गुरुवीर सुपर इन्फ्रा चे विक्रम भाऊ देवदरे व अभिजीत भाऊ डेरे, उद्योजक श्री. सागर पवार व त्यांच्या सौभाग्यवती रेखा सागर पवार, श्री. मनोजकुमार पटवा व त्यांच्या सौभाग्यवती सोनाली मनोजकुमार पटवा, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे, स्व. जिवराजजी नेमीचंदजी ओसवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारस ट्रेडिंग कंपनी चे श्री. जयंतीलाल ओसवाल या सर्वांनी अनमोल असे सहकार्य करीत हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन कडे मदत सुपूर्त केली.