शिरोली येथील राहुल सावंत च्या खुनाचा खेड पोलिसांनी लावला १२ तासात छडा....
राजगुरूनगर : शिरोली येथील राहुल सावंत याचा खून झाल्याची घटना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली होती चांडोली कडूस रस्त्यानजीक चांडोली गावच्या हद्दीत ढुम्या डोंगराच्या पायथ्याला वीट भट्टी शेजारील मोकळ्या जागेत राहुलचा मृतदेह आढळला होता राहुलचा खून नक्की कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत प्राथमिक तपासात जमिनीचे व्यवहाराचे व पैशाची कारणावरून खून झाल्याची फिर्याद फिर्यादीची बहीण मोहीनी महेंद्र राक्षे वय वर्ष 30 राहणार राक्षे वाडी तालुका खेड जिल्हा पुणे हिने खेड पोलिसात दिली आहे खुनाची घटना उघडकीस येताच खेड पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे राहुल बाबाजी सावंत याच्या डोक्यात कसल्यातरी जड वस्तूने मारून त्याला सुनील मोहन पवार नाव पत्ता माहीत नाही शिवा कुडेकर हेमंत वाडेकर राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे यांनी जीवे मारले असल्या ची फिर्याद दाखल झाली आहे. लवकरच या गुन्ह्याचा संपूर्ण छडा लावणार असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले आहे.
सदरचा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी दाखल केला असून पोलीस निरीक्षक गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील गाढवे सचिन जतकर शेखर भोइर निखिल गिरीगोसावी यांनी उलगडा केला आहे.यापूर्वी देखील शिरोली येथील डोंगरावर झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा खेड पोलिसांनी तत्काळ केला होता.