ब्रेकिंग न्यूज

दत्ताभाऊ कंद यांना २०२० चा समाजगौरव पुरस्कार .....

13/12/2020 21:27:57  230   अँड. निलेश आंधळे

नागपूर : दि.10 डिसेंबर 2020 रोजी जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त सामाजिक विकास क्षेत्रात समाजसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनकल्याण प्रतिष्ठाण चे संस्थापक,केंद्रीय मानवाधिकार सगंठन नई दिल्ली राष्ट्रीय संघटक/सहसचिव श्री दत्ताभाऊ कंद पाटील यांना समाजगौरव 2020 चा पुरस्कार देण्यात आला नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केद्रिंय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंदजी दहिवले यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी हरिओम सचितनंद लहरी महाराज वरिष्ठ निरक्षक एस एस कुमरे साहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँन्सर हाँस्पिटल नागपूर चे डाँ रामकृष्ण छंगाणी राष्ट्रीय उपाध्यक्ष डाँ कुमेश्वर भगत मानवाधिकार मिडिया फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश सहसचिव अँड प्रितम शिंदे जनकल्याण प्रतिष्ठाण सचिव बाळासाहेब शिंदे सर मानवाधिकार मिडीया फाऊंडेशन खेड तालुका अध्यक्ष संदेश जाधव उपस्थित होते दत्ताभाऊ चे समाजकार्य बाबत जनकल्याण प्रतिष्ठाण च्या माध्यमातून कडूस पंचक्रोशीत जनतेसाठी दरवर्षी विविध आरोग्य शिबीर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप अनाथ आश्रमातील अंध अपंग मुलांसाठी कपडे वाटप कंदवाडी गारगोटवाडी गावच्या विकास कामात नेहमीच हिरहिरीने सहभाग घेत विविध विकास कामांचा पाठपुरावा करून कामे पुर्ण केलेली आहे तसेच खेड तालुक्यातील अनेक तरूणांना रोजगार मिळऊन दिला खेड  तालुक्यात मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून गोर गरिब जनतेला आपला हक्क न्याय  मिळुऊन देण्यासाठी नेहमीच लढत आहे