ब्रेकिंग न्यूज

*आठ पोलिसांची निर्घृणपणे हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे पोलिस एन्काऊं

10/07/2020 05:25:56  838   वैभव काळे घोडेगाव

*आठ पोलिसांची निर्घृणपणे हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे पोलिस एन्काऊंटर मध्ये ठार*

      मध्यप्रदेश मधील महाकलेश्र्वर मंदिरातून अटक करण्यात आलेला क्रूरकर्मा कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिस एन्काऊंटर करण्यात आला असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांनी दिली आहे.

     आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला विशेष पथकाने अटक करून कानपूर ला चालवले होते. यावेळी पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्याने संधीचा फायदा घेऊन त्याने पोलिसांकडील शस्त्र हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

     पोलिसांबरोबर केलेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दूबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले परंतु ते न ऐकता त्याने पोलिसांवर फायरिंग चालू ठेवली व त्या चकमकीत विकास दुबे हा जखमी झालं होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. तसेच या चकमकीत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.