खेड तालुक्यात आज पाच नवे पॉझिटिव्ह....
तर राजगुरूनगर शहरातील शासकीय कार्यालयांतील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह !!
राजगुरूनगर : खेड तालुक्यात युनिकेअर हॉस्पिटल मध्ये काल रजिस्टर झालेल्या एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच येलवाडी येथे देखील ४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने आता खेड तालुक्यात ५ नवे रुग्ण वाढले आहेत.
त्याचबरोबर राजगुरूनगर जिल्हा व सत्र न्यायालयात तालुक्याबाहेरून येणारा एक न्यायालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. न्यायालयात विशेष काळजी घेतली जात असून अतितातडीच्या कामासाठीच न्यायालयात यावे असे आवाहन वकील बारचे अध्यक्ष सुभाष कड व संजय पानमंद यांनी केले आहे.
तसेच वाडा रोड येथे असलेल्या एल.आय.सी कार्यालयातील पुण्याहून येणारा एक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांत विनाकारण येणाऱ्यांनी देखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.सदर चे दोन्ही कर्मचारी हे त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना खेड तालुक्यात ग्राह्य धरले जात नाही.
याबाबत अधिकृत माहिती खेड पंचायत समिती सभापती अंकुश भाऊ राक्षे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी पुणे ब्रेकिंग न्यूज शी बोलताना दिली.