खेड मधील राक्षेवाडीत सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण....
पहा कोणकोणता परिसर होणार सील ?
काय असेल सुरू ? काय होणार बंद वाचा सविस्तर बातमी .....
राजगुरुनगर : गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस प्रशासन डॉक्टर यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे तसेच राजगुरूनगर परिसरातील नागरिकांनी पाळलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा एकही रुग्ण या परिसरात सापडला नव्हता.
परंतु काल रात्री राक्षेवाडी येथील एक जहांगीर हॉस्पिटलमध्ये कामास असलेला कर्मचाऱ्याला ताप तसेच श्वसनश्वासाला त्रास होऊ लागल्याने एका खाजगी दवाखान्यात तपासणी साठी गेला तेथून त्याला जहांगीर रुग्णालयात हलवले काल रात्री सदर इसमाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण राजगुरूनगर परिसरातील नागरिकांना धक्का बसला असून अनेकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जवळचे नातेवाईक, संपर्कात आलेला सलून व्यावसायिक, तपासणी केलेले डॉक्टर व त्यांचा मदतनीस अशा एकूण ११ लोकांना कोरोंटाईन करण्यात आले आहे. तसेच कोरोना बाधिताची बायको खेड सिटी मधील एका कंपनी मध्ये कामाला असल्याने जवळच्या संपर्कात आलेल्या ५ महिलांना देखील कोरोंटाईन करण्यात आले आहे.याशिवाय कोरोनाबाधिताची पत्नी निमगाव खेड सिटी येथील एका कंपनीत नोकरी करते.या कंपनीतील २९ महिलापैकी ५ सहकारी कामगार महिला आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या २२ फ्लॅट मधील ८७ जणांना त्यांच्या राहत्या घरी होम कवारं टाइन केले आहे.संबंधित कंपनी गुरुवारी रात्री पासून पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे
त्यातच आज सकाळपासून काही अतिउत्साही लोकांनी सदरची बाब सोशल मीडियातून पसरून वातावरण तापवयाचे काम केले त्यातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची ओळख जाहीर करणे गुन्हा असताना अनेकांनी अशा पोस्ट फिरवल्याने त्यांच्यावर आता कुठली कारवाई होणार हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
खेड उपविभागाचे प्रांत अधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार
हा असेल कॉन्टामेंट झोन (संक्रमित क्षेत्र) :
राक्षेवाडी ग्रामपंचायत हद्द, राजगुरूनगर नगरपरिषद प्रभाग क्र. २ चा दक्षिणभाग व प्रभाग क्र. ३ चा उत्तर भाग असा ५०० मीटर चा परिसर कॉन्टामेंट झोन घोषित करण्यात आला आहे. यात एस.टी. स्टँड कडून राक्षेवाडी कडे जाणारा रस्ता, पाबळ रोड कडून राक्षेवाडी कडे जाणारा रस्ता, राक्षेवाडी गणपती मंदिर, भांबुरवाडी कडून राक्षेवाडी कडे जाणारा रस्ता, सांडभोर वाडी कडील रस्ता, राक्षेवाडी, भांबुरवाडी ओढ्या कडील रस्त्यापर्यंत, रॉकडेवस्ती कडे जाणारा रस्ता हा परिसर सील करण्यात आलेला असून या भागातील सर्व कामकाज पूर्णपणे बंद असणार आहे.
हा असेल बफर झोन :
राजगुरूनगर शहरातील इतर भाग हा बफर झोन घोषित करण्यात आला असून यात १. पश्चिमेस सातकरस्थळ
२. उत्तरेस तिन्हेवाडीरोड (वाळुंजस्थळ)
३. दक्षिण कडील भीमा नदी पर्यंतचे क्षेत्र
या परिसरातील देखील फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानेच सकाळी ७ ते रात्री ७ उघडी राहणार आहेत.
सदरचा आदेश २८ दिवसाकरिता लागू करण्यात आला असला तरी सुरवातीचे ३ दिवस हाय रिस्कचे असल्याने त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील असे प्रांत संजय तेली साहेब यांनी सांगितले.
हे असेल सुरू :
#पाबळरोड वाहतुकीसाठी सुरू असेल.
#बफर झोन मधील कामगारांना बाहेर ये जा करता येईल.
#बफर झोन मधील भाजी बाजार सकाळी ७ ते रात्री ७ सुरू असेल.
#बफर झोन मधील अत्यावश्यक सेवा अविरत सुरू असेल.
हे असेल बंद :
#राक्षेवाडी गुळाणी रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असेल.
#कॉन्टामेंट झोनमधील येणे-जाणे पूर्णपणे बंद असेल
#कॉन्टामेंट झोनमधील सर्व व्यवहार बंद असतील.
तीन दिवस इतर सर्व दुकाने बंद राहतील.
प्रांत कार्यालय येथे याबाबतची बैठक पार पडली यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे,तहसीलदार सुचित्रा आमले,पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, राजगुरूनगर नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप यावेळी उपस्थित होते.